यवतमाळ स्थानिक पाटीपुरा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. याही वर्षी डॉ...
यवतमाळ
स्थानिक पाटीपुरा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी, सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे गठन करण्याचे निमित्ताने काल दि. ११/०१/२०२३ रोजी सायंकाळी सात वाजता रमाबाई आंबेडकर बुद्ध विहाराच्या प्रांगणात, पाटीपुरा परिसरातील समस्त बंधू भगिनींच्या उपस्थितीत अध्यक्ष मंडळाच्या निवडीसाठी खुल्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बहुसंख्येने महिला व बांधव उपस्थित होते. या सभेचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट अमोल गणवीर यांनी स्थान भूषवीले. या सभेत सर्व समाजाच्या वतीने सर्वानुमते शोभना नरेश कोटंबे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
उर्वरित पदाधिकाऱ्यांची निवड समाजातील जबाबदारी स्वीकारण्यास सक्षम असणाऱ्यांमधून आज करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रामुख्याने, मुख्य निवड प्रक्रियेत, समाजातील सामाजिक कार्यकर्ते रवी वासनीक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी रामटेके, पाटीपुरा परिसरातील माजी नगरसेविका पल्लवी रामटेके, दुसऱ्या माजी नगरसेविका पुष्पा शिव प्रसाद राऊत, माजी नगरसेवक गणेश धवणे, परिसरातील दारूबंदी आंदोलनाचे प्रमुख उमेश मेश्राम, राजा गणवीर, मधुकर भैसारे, नितीन मेश्राम, समाज जोगळेकर, विनोद शेंडे, विजय धुळे, श्याम बनसोड, श्याम मेश्राम, एडवोकेट राहुल पाटील, संतोष पाटील, रितेश मुन उपस्थित होते. तर या सर्वांनी, सौरव मेश्राम, सावन चौधरी, राहुल सहारे, शंकर भस्मे, शारदा नागदिवे, कविता नागदीवे, विना नागदिवे, जया ढोके, रोनाल्ड फुलझेले, शशिकांत मेश्राम, आकाश वाणी, सुनंदा पानतावणे, नीलिमा भैसारे इत्यादींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन, सभा पार पाडली.
वरील प्रेस नोट आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून, उपकृत करावे...🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments