. पब्लिक पोस्ट (दिनेश खांडेकर) पुसद -क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अमरावती विभागीय क्रीडा अधिकारी यांच्या संय...
.
पब्लिक पोस्ट
(दिनेश खांडेकर)
पुसद-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अमरावती विभागीय क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्तविद्यमाने द्वारे आयोजित विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पुसद तालुक्यातील श्रीरामपूर परिसरातील स्व. शंकराव चापके बहुद्देशीय संस्था, अंतर्गत गुरुकुल कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी मैदान गाजवले व त्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पुणे येथे निवड झाली.
ही स्पर्धा २३जानेवारी२०२३ रोजी यवतमाळ येथे जिल्हा क्रीडा संकुल मध्ये पार पडली.
यामध्ये गुरुकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षे वयोगटात कु. आर्या जाधव या विद्यार्थिनीने ३००० मीटर चालणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर ऋषिकेश दशरथकर या विद्यार्थ्याने तिहेरी उडी या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी वाटचालीमुळे खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यार्थ्यांचे क्रीडा मार्गदर्शक विक्रम कैलास राठोड,शाळेचे संचालक श्रीकृष्णराव शं. चापके, डॉ. प्रा. प्रल्हाद वावरे , सौ अनिता धनंजय चापके, मुख्याध्यापिका सौ. दिक्षा रणवीर, सर्व शिक्षक व पालक आदींचे मार्गदर्शन लाभले.
या यशामुळे विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments