Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

बाभूळगाव  (प्रतिनिधी)   बाभुळगाव तालुक्यातील पहुर या ठिकाणी 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन गुरुवार 19 तारख...


बाभूळगाव
 (प्रतिनिधी)
  बाभुळगाव तालुक्यातील पहुर या ठिकाणी 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन गुरुवार 19 तारखेला श्री. केशवराज महाराज विद्यालय पहुर या ठिकाणी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी कुमरे उद्घघाटन रापतिवार, विस्तार अधिकारी मंगेश देशपांडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भूमकाळे, पंचायत समितीचे उपशिक्षणाधिकारी तथा डॉ.हजारे,काळे ,ठाकूर,ऐंडे सर तथा केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती इत्यादींच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केल्यानंतर त्या ठिकाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवनृत्य सादर केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक जीवन पडसोडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना विज्ञानाची किमया विद्यार्थ्याना विज्ञान हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असून या विज्ञानामुळेच आज जगामध्ये मोठी महान क्रांति झाली आहेत. आपण त्याचे शिल्पकार आहात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची चिकित्सा आणि संशोधन निर्माण व्हावे याकरिताच हा प्रयास करीत आहोत. परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे ज्ञान अवगत व्हावे याकरिता सातत्याने प्रयत्न करीत आहोत. घराच्या उंबरठ्यापासून तर सर्वसामान्य जीवनापर्यंत विज्ञानाची किमया आजही कायम आहे.त्यामुळेच आपला देश हळूहळू विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याचा उंच भरारी घेत आहेत. हा प्रयास मनाशी घेऊनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने  प्रयास केलेला आहे.
उद्घाटकीय भाषणाच्या वेळी यवतमाळ येथील अधिव्याख्याता रापरतींवार यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना जीवशास्त्र यांच्या विविध प्रकारच्या संकल्पना आपल्या मनोगतातून व्यक्त करायला लावल्यास तसेच श्रोत्यांना सुद्धा प्रश्न उत्तर विचारून विज्ञानाच्या विविध प्रकारच्या असणाऱ्या सज्ञा सुद्धा समजून सांगितल्यात. विविध संशोधनापर्यंतच्या अनेक बाबतीत स्पष्टपणे सांगितले विविध शास्त्रज्ञांची उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना  अनमोल मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीतील आणि विज्ञानाच नातं कसं आहे याबाबतचे विविध प्रश्नांची उत्तरे देऊन आपलं मनोगत व्यक्त केलं.
यावेळी कृषी अधिकारी चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना शिक्षकांमुळेच आपण विज्ञान अवगत करत असतो विज्ञानामुळे कुणाचीही प्रगती शक्य नाही. पारंपारिक संस्कृतीचा जरी आपण अभ्यास करत असलो तरी विज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भूमकाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना, विज्ञान हे परिवर्तनवादी सत्यापासून समोर आले आहे. एका सत्याला स्वीकारणे हीच खरी कसोटी आहे. कार्यक्रमाचे संचालन विनोद खसाळे यांनी केले.

No comments