यवतमाळ (प्रतिनिधी) नगर परिषद कला व क्रीडा महोत्सव दिनांक 27 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत यवतमाळ येथील आझाद मैदानावर संपन्न...
यवतमाळ
(प्रतिनिधी)
नगर परिषद कला व क्रीडा महोत्सव दिनांक 27 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत यवतमाळ येथील आझाद मैदानावर संपन्न होणार आहे.आजच्या सभेत यवतमाळ नगर परिषद कला व क्रीडा महोत्सवाच्या सचिवपदी सत्यम शेंबाळे तर सहसचिव रेखा वरखडे मॅडम,सिताराम राठोड यांची एकमताने निवड करण्यात आली.
दिनांक 27 ते 30 जानेवारीपर्यंत चार दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवाकरिता एकूण 8 समित्याची यावेळी निवड करण्यात आली. क्रीडा महोत्सवात नगर परिषदेच्या एकूण 18 शाळांचे विद्यार्थी मैदानी खेळात आपले नैपुण्य दाखविणार आहेत.त्याचबरोबर विविध वैयक्तिक स्पर्धा, तसेच दिनांक 28 व 29 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी यवतमाळकरांना अनुभवता येणार आहे.त्यानंतर क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होईल.संपूर्ण कला व क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर साहेब व उपाध्यक्ष प्रशासन अधिकारी मा.निता गावंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा महोत्सव पार पडणार आहे. याचे संपूर्ण नियोजन आजच्या सभेत करण्यात आले.या सभेला केंद्रप्रमुख विलास काळे,पुनाजी मेश्राम, राजेंद्र मेनकुदळे, राजेंद्र कटकमवार तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. असे कला व क्रीडा महोत्सवाचे प्रसिद्ध प्रमुख डॉ.विनोद डवले यांनी कळविले आहे.
No comments