Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

शिवसेनेच्या कार्यकर्त्याची निर्घुण हत्या

यवतमाळ शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची खुलेआम हत्या   यवतमाळ पासून 15 किलोमीटर अंतराव...


यवतमाळ
शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची खुलेआम हत्या
  यवतमाळ पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेला भांब राजा येथे आज सायंकाळी सात वाजता चे दरम्यान थंडीत शेकोटीवरती हात शेकत असताना अचानकपणे गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तथा ग्रामपंचायतचे सदस्य सुनील डीवरे याची तलवार मारून व बंदुकीची गोळी घालून हत्या करण्यात आली. भांब येथील नागरिकांनी त्यांना यवतमाळ येथे उपचारासाठी आणले परंतु रस्त्यातच गतप्राण झाल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे अज्ञात मारेकरी चा वृत्त लिहीपर्यंत कुठल्या प्रकारचा पत्ता लागला नाही. परंतु पोलिसांना हत्येची खबर मिळाली व लगेच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. या हत्या प्रकरणांमध्ये स्थानिक राजकारण आहे की राजकीय हस्तक्षेप आहे हे मात्र तपासाअंती समोर येणार आहे.परंतु अज्ञात मारेकरी तोंडाला मास बांधून आले असल्याचे सांगण्यात येते.

No comments