Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

आयुष्य घडविणाऱ्या महिलांचा गौरव

यवतमाळ प्रतिनिधी एच आर ग्रुप यवतमाळच्या वतीने रमाई जयंतीच्या शुभपर्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वैशाली सोसायटी येथे...



यवतमाळ प्रतिनिधी
एच आर ग्रुप यवतमाळच्या वतीने रमाई जयंतीच्या शुभपर्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वैशाली सोसायटी येथे आयुष्य घडविणाऱ्या महिलांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
रमाईच्या त्यागाला आठवून कुटुंब कसं घडवावं हे रमाईच्या जयंतीनिमित्त
बापमाणूस स्त्रियांचा सोहळा एच आर ग्रुप ने साजरा केला. लोकांची धूनीभांडी,मिळेल ते काम करून आपल्या मुलांना शिक्षण देउन मोठ्या पदावर कार्यरत करणाऱ्या माउल्यांचा सन्मान केला. स्वतःला चुली पुरत मर्यादित न ठेवता पुरुषाच्या वाटेला आलेले अंगमेहनतिचं काम, घरातली चूल सांभाळून इतरांनकडे धुणे भांडी,स्वयंपाक, गवंडीकाम ,भाजीपाल्याचा गाडा, झुणका भाकर चा गाडा लावून संसाराचा गाडा चालणाऱ्या माऊलीना आम्ही सन्मानित केलं.
 मूल जन्माला घालणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु जन्माला घातलेल्या मुलाचं नीट संगोपन करून त्यांना समाजात वावरण्यासाठी कर्तबगार बनवून उच्च पदावर बघणं  ही खरी कर्तबगार स्त्री ची ओळख आहे.

सत्कार सन्मान करावा ही मनोमन इच्छा होती आणि तिला रूप ही दिल.
एक उपक्रम म्हणून घेतलेला कार्यक्रम हा आमच्या जीवनाची दिशा बदलवेल असं वाटलं नव्हतं.
 स्त्रियांचा सन्मान करतांना त्या शब्दात व्यक्त झाल्या आम्ही भांडी घासली पण आमच्या मुलाने कधी घासू नये त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं अधिकारी व्हावं यासाठी आम्ही दिवस-रात्र काम करू अशी त्यांच्या मनात ठाम निश्चय होता.

निलुबाई गवई
 यांनी गवंडी काम करून दोन मुली नोकरीवर लावल्या एक कृषी खात्यात कार्यरत आहे. तर दुसरी अधीक्षक आहे. आणि मुलगा शिक्षण घेत आहे म्हणत आमची धन्यवाद मानली.

पुष्पा परचाके 
यांनी भांडी घासून मुलाला बारावीपर्यंत शिक्षण शिकविलं आणि निलेशची मिल्ट्री मध्ये निवड झाली.मुलगी प्रगती शिक्षण घेत आहे. तिला ही मोठं व्हायचं मॅडम  म्हणत स्मित हास्य दिलं.

बिना भगत 
 यांची तर बातचं और यांनी लोकांच्याघरी धुनी भांडी स्वयंपाक करून मुलांना शिक्षण दिलं  मुलगा घरची परिस्थिती बघून कॉलेज वर जॉब करतो म्हणाला. परंतु मी त्याला म्हटलं बाबू तुला जर हा जॉब करायचा असेल तर माझ्या घरातून निघून जा तुझे कपडे बांध आणि निघ माझ्या झोपडीतुन जर इथं राहायचं असेल तर मोठा अधिकारी होऊनच राहा. मी तुमच्यासाठी  अजून दोन वर्ष लोकांची भांडी घासेल उष्ट खरकटं उचलेल पण तू अधिकारी व्हायचं.काळजी करू नको मी सक्षम आहे. असे म्हणून त्याला मी प्रेरित केलं आणि आज माझा मुलगा हर्षद भगत यांना सेंट्रल गव्हर्नमेंट MECL मध्ये अधिकारी आहे.मुलगी पुनम भगत अधीक्षक म्हणून तिची निवड झाली. अजूनही खूप अभ्यास करते आई मला याहूनही वरची पोस्ट मिळवायची आहे. लग्नाची गोष्ट केली तर उधळून लावते. आई  लग्नाची घाई नाही अधिकारी व्हायचं मग लग्न असा तिचा ठाम निर्णय आहे. दुसरा मुलगा हा सिव्हिल इंजिनियरिंग झालेला आहे.
माझ्या अधिकारी मुलाने
मला पस्तीस लाखाचं घर घेऊन दिलं मुलीने पंधरा लाख माझ्या नावाने फिक्स मध्ये टाकले. मुलं घडवण्याचं समाधान आहे.
त्या जेव्हा हे सगळं सांगत होत्या आम्ही या आयोजक महिला आणि समोर बसणारी श्रोते अश्रू गाळत ढसाढसा रडत होती.
शोभा कुळसंगे, सरला पाटील, ज्योती मसराम, लता मडावी, सुलोचना मेश्राम  यांनी सुद्धा आपली अनुभव सांगीतले. आमची मुलं आम्ही घडवत आहोत, घडवत राहु उद्याचे ते नक्की अधिकारी, सुशिक्षित नागरिक होतील असं आश्वासन देऊन आमच्याकडून निरोप घेतला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जीवन भोवते , वर्षा गायकवाड  (सहकारी अधिकारी) सौ.चंदा बडवाईक ,लीना गोरख, रामभाऊ वाघमारे, माया बोरकर ,इंदुमती गजभिये, हिरा फुलमाळी,सुनीता वाघमारे, कमलाबाई मालखेडे, लिलाबाई वाकडे, शालन वाघमारे, प्रेमिला शेलारे,पुष्पा मनवर कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रियाताई वाकडे प्रास्ताविक शुभांगी मालखेडे तर आभार प्रदर्शन कांचन जुमनाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता
प्रिया वाकडे, कांचन जुमनाके,प्रज्ञा खडसे,कवीता जावेंदिया, गीताबाई जावेंदीया,प्रतीक्षा वाघमारे,शालन वाघमारे,शुभांगी मालखेडे,
 समता दुपारे,उषा उके,सावन मडावी, अर्चना कोचे,निलम फुलमाळी, जयश्री फुलमाळी,आशा वाळके, प्रीती गावंडे, साक्षी लोखंडे,मिताली घुले, अश्विनी फुलमाळी, स्नेहल डोंगरे, ज्योत्स्ना गौरकार,मेघा लढे ,छाया सवाळे, दीपाली खंडारे, संयुक्ता शेजव, अलका वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments