Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

कलावंत शिक्षक रविंद्र ढगे यांची सेवानिवृत्ती

यवतमाळ (प्रतिनिधी) शिक्षण विकास मंडळ दाभा द्वारा संचालित किमान कौशल्यावर आधारित व्यवसायिक अभ्यासक्रमातील शिक्षक तथा कलावंत रवींद...



यवतमाळ
(प्रतिनिधी) शिक्षण विकास मंडळ दाभा द्वारा संचालित किमान कौशल्यावर आधारित व्यवसायिक अभ्यासक्रमातील शिक्षक तथा कलावंत रवींद्र ढगे यांना आज संस्थेच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राध्यापक वसंत परोपटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष डॉ. आनंद हजारे व संस्थेचे पदाधिकारी देविदास परोपटे व दाभा येथील पत्रकार सुभाष परोपटे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या वतीने शिक्षक रवींद्र ढगे व त्यांच्या पत्नी नीलिमा ढगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ढगे यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सुद्धा गौरव केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील मुख्याध्यापक महेंद्र ठाकूर, प्रा. प्रकाश संगीतराव, मंगला सुलताने व प्रा.कोवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यवतमाळ येथून आलेले राठोड, सिंगानिया व जोशी मॅडम यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन पवन बन यांनी केले तर आभार प्रा. दीपक वाघ यांनी मानले.

No comments