Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावनाच आनंददायी आहे! विद्या सुनील खडसे

      यवतमाळ  पब्लिक पोस्ट  प्राथमिक  शाळा मोहा फाटा येथे अंकुर साहित्य संघ यवतमाळच्या वतीने आगळा वेगळा उपक्रमाद्वारे  प्रजासत्त...

 
    यवतमाळ 
पब्लिक पोस्ट
 प्राथमिक  शाळा मोहा फाटा येथे अंकुर साहित्य संघ यवतमाळच्या वतीने आगळा वेगळा उपक्रमाद्वारे  प्रजासत्ताक दिन साजरा  करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अंकुश वाकडे सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख अतिथी विद्या खडसे जिल्हाध्यक्ष अंकुर साहित्य संघ यवतमाळ ह्या होत्या.प्रमुख उपस्थिती प्रमोद देशपांडे शाखाअध्यक्ष, ,सुरेशराव गांजरे केंद्रीय उपाध्यक्ष, सुनील खडसे ,इंजि.मनोहर शहारे, पुरुषोत्तम ठोकळ मुख्याध्यापक मोहा यांची होती . गावांमध्ये कोरोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करून गावाला ज्ञानदान करणार्‍या दहा सावित्रीच्या लेकींना अंकुर साहित्य संघाद्वारे स्नेहभेट देवून गौरविण्यात आले. कोरोनाचे महाभयानक संकट असताना जिल्हा आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावनाच आनंददायी आहे. विद्या सुनील खडसे मात्र शाळा पूर्णपणे  बंद असून सुद्धा शिक्षण सुरू हा अभिनव उपक्रम मोहा या गावांमध्ये सुरू करण्यात आला होता,  हयाकरिता शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम ठोकळ यांनी ह्याबाबत विशेष परिश्रम घेण्यात आले होते.गावातील शिकलेल्या दहा तरुणींना एकत्रित करून गावातील  लहान मुलांना अध्यापनाचे कार्य करावे याकरिता त्यांनी  मुलींना प्रोत्साहीत केले त्यामुळे सावित्री जिजाऊ  लेकींनी   उल्लेखनीय कार्य केले आहे. यावेळी अंकुर साहित्य संघाचे वतीने  यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या प्रा अंकुश वाकडे  व मुख्याध्यापक पुरुषोत्तम ठोकळ यांचा शाल श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला. गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोलाची मदत करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवणे या अतुलनीय कार्याबद्दल हा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाच्या वेळी   लहान बालकांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्यपूर्ण  मनोगत सुद्धा व्यक्त केले.ह्या कार्यक्रमाला सुवर्णा ठाकरे ,रश्मी कोराने, अलका राऊत,  शाळेतील शिक्षकांची प्रामुख्याने उपस्थिती होती .संचलन स्मिता कांबळे शिक्षिका व आभार अशोक जाधव ह्यांनी मानले.

No comments