Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

एक समुपदेशन केंद्र सुरळीत सुरु असताना दुसरे कशाला? —प्रा. डाॅ. लीला भेले

महा.राज्य महिला व बालविकास विभागा अंतर्गत पांढरकवडा या तालुक्याच्या ठिकाणी तब्बल 12 वर्षापासून  महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेल...

महा.राज्य महिला व बालविकास विभागा अंतर्गत पांढरकवडा या तालुक्याच्या ठिकाणी तब्बल 12 वर्षापासून  महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेले महिला समुपदेशन केंद्र सुरळीतपणे सुरु आहे. फुले आंबेडकर महिला प्रबोधिनीच्या वतीने प्रा. डाॅ. लीला भेले हे केंद्र पांढरकवडा,त. केळापूर  जि. यवतमाळ येथे सक्षमपणे महिलांसाठी मदत कक्ष चालवित आहेत. या ठिकाणी प्रतिभा  दुर्गे आणि करूणा रामटेके या दोन पात्र काॅन्सिलर्स  काम पाहात आहेत महिला व बाल विकास विभागाने मुलाखतीद्वारे त्यांची निवड केली आहे. आजवर या केंद्रात 1350 पिडीत स्रियांच्या केसेसचा  निपटारा होउन जवळपासच्या आठ तालुक्यातील
 महिलांना याचा फायदा झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार पांढरकवडा पोलिस स्टेशन अंतर्गत या केंद्राचे कार्य अव्याहत पणे सेवाभाव  हेतूने सुरु आहे.
शासननिर्णया  नुसार महिला समुपदेशन केंद्रासाठी महिलांना हक्काचा कक्ष मिळावा म्हणून महा. राज्य महिला व बालविकास विभागाने ज्या ज्या संस्थांवर  जबाबदारी सोपविली त्यांना शासकीय परिपत्रकानुसार  समुपदेशन केंद्रासाठी जागा आणि इतर सुविधा, तसेच  स्रियांच्या तक्रारी प्रथमतः महिला समुपदेशन केंद्राकडे पोलीस विभागाने द्याव्यात.कुटुंबाचा समेट घडून येईल. कौटुबिक हिंसाचाराच्या केसेस मध्ये  महिलांना कायद्याची  मदत उपलब्ध  व्हावी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी संरक्षण अधिकारी कार्याल्य निर्माण केले. पुलिस स्टेशन, महिला समुपदेशन केंद्र, आणि संरक्षण अधिकारी यांच्या समन्वयाने स्रियांच्या केसेसमध्ये समेट घडून येतो.
तसे निर्देश तत्कालीन महिला व बाल विकास अधिकारी, श्री. राठोड साहेब,अर्चना इंगोले, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि DYSP बायससाहेब यांनी दिले. काही वर्षापर्यंत पुलिस विभागाने कार्यालयाला उपलब्ध करुन दिले होते.
या आठवड्यात पांढरकवड्यात नवीनच पाटी लागलेली पाहून लीला भेले यांनी आश्चर्य व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य महिला  आयोगा अंतर्गतः "महिला मदत व समुपदेशन केंद्र  पांढरकवडा" 
उमेद कार्यालय...  
ही पाटी पाहून अनेकांना  आश्चर्य वाटले.
यासंदर्भात जिल्हा महिला व बाल विकास
 विभागाकडे तक्रार केल्याची माहिती लीला भेले यांनी दिली.   
लीला भेले गेल्या चाळीस वर्षापासून स्रियांच्या चळवळीत आहेत.कुमारी मातांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर,त्यांच्या बालकांच्या संगोपण  आणि शिक्षणावर मनोधैर्य अंतर्गत सक्षमपणे न्याय  देण्याचं काम केलेआहे.केलेल्या कामाची पावती  अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महा. शासन, भीमरत्न पुरस्कार मुंबई, नवदुर्गा पुरस्कार लोकसत्ताने देउन त्याना गौरविले आहे.शासनाच्या विविध समित्यांवर  त्या सदस्य आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या नावाने दुर्गम भागात शाळा काॅलेज, योग शिक्षण, निःशुल्क नालंदा अकादमी तीस वर्षापासून  सुरु आहे.कायदे जाग्रुती मेळावे, महिला जाणीव जागर आणि बालिकांसाठी कार्यशाळा, महिला मेळावे असे विविध उपक्रम महिला समुपदेशन केंद्र आयोजीत करत असते.
एक केंद्र सुरळीत सुरु असताना दुसरे कशाला असाही सवाल त्यांनी केला. सद्यस्थितीत जिथे कोणतेही केंद्र नाही तिथे केंद्र द्या. तेथील महिलांना फायदा होईल. हा  गुंता सोडविण्यासाठी मा. महा.राज्य महिला आयोगाने,  मा.जिल्हा महिला व बालविकास विभाग यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी ,मा. जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पो अ., पोलिस स्टेशन पांढरकवडा यांनी लक्ष घालून योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी आहे.

No comments