Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

काल थाटात संपन्न झाला अनाथांच्या नाथाचा जन्म दिवस सोहळा

यवतमाळ              सम्राट अशोक बुद्ध विहाराचे नवनिर्माता तथा गावामध्ये नव्यानेच निर्माण होत असलेल्या भव्य अशा स्वरुपाच्या स्मारकाचे शिल्पका...


यवतमाळ 
            सम्राट अशोक बुद्ध विहाराचे नवनिर्माता तथा गावामध्ये नव्यानेच निर्माण होत असलेल्या भव्य अशा स्वरुपाच्या स्मारकाचे शिल्पकार, सन्माननीय, *"_जीवन रामटेके साहेब_"* यांचा काल संपूर्ण गावकरी तथा बौद्ध समाज बांधव आणि युवा मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व रामटेके साहेबांच्या सहपरिवारासमवेत मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये डीजेचा धमाका करून जबरदस्त असा जन्मदिवस सोहळा उत्सवासारखा संपन्न करण्यात आला.
       यादरम्यान त्यांच्या परिवारासोबत समस्त गावकरी उपस्थित होते आणि अख्खा बौद्ध समाज भक्कमपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून जल्लोष साजरा करत होता आणि महापुरुषांना मानवंदना देऊन केक कापण्यात आला व भव्य स्वरूपात भोजनदान वितरित करण्यात आले. "_जगेल तर समाजासाठी - मरेल तर समाजासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जीवन रामटेके साहेब तुम आगे बढो - हम तुम्हारे साथ हैं_"* अशा नाऱ्यांचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी करत गावामध्ये धुमाकूळ घालण्यात आला. या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सम्राट अशोक विहाराचे सर्व कर्ते- धर्ते युवा भीमसैनिक यांनी सांभाळली, भोजनदान झाल्यानंतर रात्रीचे १२ वाजेपर्यंत डिजेचा आनंद लुटत सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.खूप सुंदर असे आयोजन आणि नियोजन करण्यात आले व समाजाचा मसिहा ठरलेल्या कार्यकर्त्याला म्हणजेच जीवन रामटेके साहेबांना त्यांच्या जन्मदिनी प्रसन्न करण्यात आले.

No comments