बाभुळगाव ता. प्र. :- यवतमाळ ते बाभुळगाव महामार्गावरील बाभुळगाव बस स्थानक नजिकच्या 'बबला' नामक पेट्रोलपंपाजवळ आज सकाळी १० वाजताचे दर...
बाभुळगाव ता. प्र. :-
यवतमाळ ते बाभुळगाव महामार्गावरील बाभुळगाव बस स्थानक नजिकच्या 'बबला' नामक पेट्रोलपंपाजवळ आज सकाळी १० वाजताचे दरम्यान चारचाकी व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला.यात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी ऑडी क्रमांक एम एच २९ सी जे ४४४४ समोरच्या बाजूला मोठा फटका बसून उजवा टायर फाटला आणि एअरबॅग कार्यान्वित झाले तर होंडा युनिकॉर्न एम एच २९ बी एस ४५८४ दुचाकी चेंदामेंदा होऊन नजिकच्या नाल्यात जाऊन आदळली.
प्राप्त माहितीनुसार दुचाकीस्वार अप्सर शेख वय १८ वर्ष, रा .कृष्णानगर, बाभुळगाव हा पेट्रोल भरण्यासाठी थांबलेला असताना चारचाकीने धडक दिली.यात दुचाकीस्वार अफसरच्या डाव्या हात व पायाला गंभीर जखमा झाल्याने नातेवाईकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दिपमाला भेंडे व जमादार विजय लोखंडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहन ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. चारचाकीचे सर्वच चाके लॉक झाल्यामुळे क्रेनची मदत बोलावण्यात आली होती.
No comments