Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात एकूण 7 जणांचा मृत्यू, वणीतील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

पब्लिक पोस्ट ब्युरो  उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग (7 Dead In Chopper Crash Near Kedarnath) जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर...

पब्लिक पोस्ट ब्युरो 
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग (7 Dead In Chopper Crash Near Kedarnath) जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 
या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान घडली. हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे. गौरीकुंडवर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच SDRF व NDRF च्या टीम्स तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. नेपाली महिलांनी जंगलात घास कापताना अपघाताची माहिती प्रशासनाला दिली. घटनास्थळ अतीव दुर्गम जंगलात असल्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो (Aircraft Accident Investigation Bureau) करणार आहे. सध्या सर्व हेली सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील वणी येथील संपूर्ण कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूनं गावात शोककळा पसरली आहे. यामधील २३ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. संबंधित यंत्रणा आता अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. वणी येथील राजकुमार सुरेश जायसवाल हे कोळशाचे मोठे व्यापारी असून, 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 दरम्यान अवघ्या विदर्भाचे लक्ष केंद्रित करणारा ऐतिहासिक ‘काशी शिवमहापुराण’ वणी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या संगीतमय सुश्राव्य वाणीचा कार्यक्रम जयस्वाल यांच्यातर्फे त्यांच्या पुढाकारणे आयोजित करण्यात आला होता.
या दुर्घटनेत राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल, आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल यांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, या कुटुंबाचा चिमुकला मुलगा विवान सध्या पांढरकवडा येथील आजोबांकडे थांबलेला असल्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला.  मृत्यूमुखी पडलेली चिमुरडी काशी हिचे नामकरण एक वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. तिच्या नावावरून वणीमध्ये काही महिन्यांपूर्वी काशी शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाच्या आधारे करण्यात आले होते. जयस्वाल कुटुंबाच्या अपघाती निधनामुळे वणी शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिक सोशल मीडियावरही शोक व्यक्त करत आहेत.मृत व्यक्तींमध्ये कॅप्टन राजबीर सिंह चौहान – पायलट, रहिवासी जयपूर विक्रम रावत – बीकेटीसी कर्मचारी, रहिवासी रासी, ऊखीमठ विनोद देवी – वय 66, रहिवासी उत्तरप्रदेश तृष्टि सिंह – वय 19, रहिवासी उत्तरप्रदेश राजकुमार सुरेश जायसवाल – वय 41, रहिवासी वणी, यवतमाळ (महाराष्ट्र) श्रद्धा राजकुमार जायसवाल – पत्नी, रहिवासी वणी, यवतमाळ काशी जायसवाल – वय 23 महिने, कन्या, रहिवासी वणी, यवतमाळ इत्यादींचा समावेश आहे. 
नुकताच अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमाना अपघाताची चर्चा बंद होताच हेलिकॉप्टर अपघातामुळे वणी येथील कुटुंब मृत्युमुखी पडलं त्याबद्दल यवतमाळ जिल्हा तसेच वनी परिसरामध्ये शोकाकुल वातावरण आहे. सामाजिक दायित्व असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन होणे ही समाजाची मोठी हानी असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय दरेकर यांनी दैनिक पब्लिक शी बोलताना दिली. 
आमदार संजय दरेकर वनी
आम्ही जयस्वाल कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी! 
चंद्रपूर वनी मतदार संघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असताना माझ्या मतदारसंघांमध्ये असणाऱ्या सामाजिक दायित्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे निधन होणे ही सर्वात दुःखद घटना आहे झालेल्या अपघाताबद्दल आम्ही दुःखी आहोत मृतकांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते ही प्रतिक्रिया धानोरकर यांनी दैनिक पब्लिक पोस्ट परिवाराशी बोलताना दिली. 
खासदार प्रतिभा धानोरकर 

No comments