पब्लिक पोस्ट (मनोहर बोभाटे) राळेगाव शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी जिर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील...
पब्लिक पोस्ट
(मनोहर बोभाटे)
राळेगाव शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी जिर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात शनिवारला दुपारी १२ वाजता सितानवमीच्या पावन पर्वावर श्रीमती सुनिता ज्ञानेश्वर उंडे रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ यांना २०२३ चा स्वयंसिद्धा सीता सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला.
यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील झाडगाव येथील येबरे घराण्यात झाला, तेथेच १० वी. पर्यंत शिक्षण झाल्यावर त्या यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी या सीतामातेच्या तीर्थक्षेत्राच्या गावातील उंडे परिवाराच्या स्नुषा झाल्या, शेतीत राबून आपला उदरनिर्वाह आपल्या दोन लहान मुलांसह सुखाने संसार सुरू असतांना आपल्याला पती वियोगाचा आघात झाला, यामुळे सर्व स्वप्न करपून गेली आणि जीवनात अंधकार झाल्याचे वाटू लागल्याने, मात्र सीता मातेची प्रेरणा दुखातून सावरायला समोर आली आणि नातेवाईकांनी दुर्लक्षित केल्यावर कणखर वृत्ती धारण करीत आपण जिद्दीने मुलांना चांगले शिक्षण व संस्कार दिले. आपले दोन्ही मुले पदव्युत्तर शिक्षणानंतर निमशासकीय नौकरी करीत असून आपण मुलांना जबाबदार नागरिक घडविले.
दरवर्षीप्रमाणे सितानवमी च्या पावन पर्वावर स्वयंसिद्धा सीता सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व हनुमान ट्रस्ट रावेरी तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो. या सोहळ्यात ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्पोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्थितीशी व समाजव्यवस्थेशी संघर्ष करून आपल्या पाल्यांना लव – कुशाप्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर व समाजातील प्रतिष्ठीत आणि सन्माननिय नागरिक म्हणून घडविले आहे. अशा कर्तुत्ववान धैर्यशिल, महाराष्ट्रातील आठ मातांचा भावपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी आमदार अॅड. वामनराव चटप तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार सरोज काशीकर, शे. म. आघाडी अध्यक्ष प्रज्ञा बापट, स्व. भा. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, प्रांताध्यक्ष मधुसूदन हरणे, स्व. भा. पार्टीचे माजी प्रांताध्यक्ष अॅड. दिनेश वर्मा, जेष्ठ लेखिका वसुंधरा काशीकर, प्रदेशाध्यक्ष स्व. भा. पा., महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, शैला देशपांडे माजी प्रांताध्यक्षा शे. म. आघाडी, सुमन अग्रवाल माजी प्रांताध्यक्ष शे. म. आघाडी, गीताताई खांडेभराड माजी प्रांताध्यक्ष शे. म. आघाडी, रंजना मामर्डे प्रदेशाध्यक्ष वि. रा. स. महिला आघाडी, जयश्री पाटील माजी प्रांताध्यक्ष शे. म. आघाडी, अंजली पातुरकर माजी प्रांताध्यक्ष शे. म. आघाडी, सतीश दानी माजी प्रांताध्यक्ष शेतकरी युवा आघाडी, निर्मलाताई झगझाप माजी प्रांताध्यक्ष शे. म. आघाडी, राजेंद्र तेलंगे सरपंच ग्रा. पं. रावेरी, बाळासाहेब देशमुख अध्यक्ष हनुमान देवस्थान ट्रस्ट, रावेरी, सोनाली मरगडे जिल्हा प्रमुख शे. सं. यवतमाळ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक सीता नवमी महिला उत्सव समिती महाराष्ट्र राज्य यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आव्हाहन केले आहे.
No comments