राळेगाव तालुका (मनोहर बोभाटे) राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 30 तारखेला पार पडणार असून त्या दृष्टीने आज दिन...
राळेगाव तालुका
(मनोहर बोभाटे)
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 30 तारखेला पार पडणार असून त्या दृष्टीने आज दिनांक 22/4/2023 रोज शनिवारी दुपारी ठीक चार वाजता शेतकरी सहकारी विकास पॅनलचे नारळ रावेरी येथील हनुमान मंदीरात महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके तसेच काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर,काॅंग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत फोडण्यात आले. त्यावेळी ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामाची माहिती दिली.त्यानंतर प्राध्यापक वसंत पुरके सरांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून परत एकदा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेवर निवडून पाठवण्याची विनंती केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद वाढोणकर यांनी केले तर आभार राजेंद्र तेलंगे यांनी मानले.या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते . तेथील गर्दी पाहता कमीत कमी पाचशे लोकांच्या जवळपास काॅंग्रेस पक्षाचे जेष्ठ,तरूण असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.जनूकाही आजच विजय झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
No comments