बाभूळगाव प्रतिनिधी इयत्ता 10 वी बोर्डाच्या परिक्षेमध्ये उत्तिर्ण झालेल्या बाभुळगाव शहरातील विद्यार्थ्यांचा शहर काँग्रेसच्या व...
बाभूळगाव
प्रतिनिधी
इयत्ता 10 वी बोर्डाच्या परिक्षेमध्ये उत्तिर्ण झालेल्या बाभुळगाव शहरातील विद्यार्थ्यांचा शहर काँग्रेसच्या वतीने दि. 15 मे रोजी पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देउन सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देवून त्यांच्याशी संवाद साधला. तालुक्यामधून प्रथम व यवतमाळ जिल्हामधुन तृतीय आलेल्या समृद्धी सुधाकर ठाकरे (97.20%) हिचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे निहारीका जिवन बद्दर (90.60%), वसुंधरा दिपक यवतीकर (90.20), तन्मय नरेश सातपुते (90.20), अनुष्का मयुरेश खडसे, तसेच वार्ड क्रं 1 मधील सोनल सतिश राऊत, अनुज मधुकर जिवतोडे, लकी सतिश मेघे, रुतिका गोपाल परचाके यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कामना करण्यात आली. यावेळी पालकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाशचंद छाजेड, नगरसेवक शेख कादर, कॉंग्रेस शहराध्यक्ष बाभुळगाव भरत भुराणे, कार्याध्यक्ष प्रेमचंद छल्लाणी, मयुरेश खडसे, प्रदिप नंदुरकर, अंकुश सोयाम, अजमत मुल्ला, प्रफुल तातेड, शहराध्यक्ष युवक काँग्रेस सचिन बेलसरे, आरिफ छव्वारे, एन.एस.यु.आय.तालुकाध्यक्ष निखिल गाडगे, अनुप गाढवे व नगरसेवक अक्षय राऊत उपस्थित होते.
No comments