पब्लिक पोस्ट प्रतिनिधी वडकी : विदर्भ राज्याचे आंदोलन समिती राळेगाव च्या वतीने बोरी (ई) येथे महाराष्ट्र सरकारचा निषेध करून...
पब्लिक पोस्ट
प्रतिनिधी
वडकी : विदर्भ राज्याचे आंदोलन समिती राळेगाव च्या वतीने बोरी (ई) येथे महाराष्ट्र सरकारचा निषेध करून काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी वेगळ्या विदर्भ झालाच पाहिजे, आपले राज्य विदर्भ राज्य, विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भाचे राज्य मिळवून घेऊ", "विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा" अशा घोषणा देऊन महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटीग, युवा अध्यक्ष अक्षय महाजन , विदर्भाच्या आंदोलन समिती तालुका अध्यक्ष गोपाल भोयर,गजानन पारखी, शेषराव ताजणे, गजानन ठाकरे, श्रीहरी राजुरकर, सौरभ महाजन, भास्कर पाटील, मोहन आवारी ,भारत खैरे, मनोहर कुंभार बाबूलाल करमणकर अशोक वाभीटकर, , रवींद्र खिरटकर, निलेश डवरे घर्षण गमे ,इत्यादी शेतकरी उपस्थित होते...
No comments