Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी दोषींना तात्काळ अटक करा.

यवतमाळ  परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटक...



यवतमाळ 
परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायी व संविधान प्रेमी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडी,जिल्हा यवतमाळ या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात येत आहे. 
महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान विटंबनांचे प्रकार वारंवार घडत असून समाजकंटकांवर शासनाचा मुळीच वचक राहिलेला नाही. अशा घटनांमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. अशा घटना घडण्यामागे आणि त्यांना संरक्षण देण्यामागे मनुवादी व जातीयवादी शक्तींचा हात असून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे. तसेच राज्यातील दलित आणि अल्पसंख्यांक पूर्णपणे धास्तावले असून शासन समाजकंटकांना पाठीशी घालून अशा घटनांकडे सोयीस्कर  दुर्लक्ष करीत असल्याची भावना निर्माण होत आहे. 
अशा समाजविघातक शक्तीचा व या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा यवतमाळच्या वतीने करण्यात येत आहे. सदर मागणीची दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीला नाईलाजाने जिल्हाभर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी एका पत्रकाद्वारे आम्ही राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिला आहे.
याप्रसंगी यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे, जिल्हा महासचिव-शिवदास कांबळे, महिला आघाडी अध्यक्षा- धम्मवती ताई वासनिक,, महासचिव पुष्पाताई शिरसाट, शहराध्यक्ष गजानन सावळे, शहर महासचिव प्रमोद पाटील, शहर कार्याध्यक्ष प्रसेंनजित भवरे, शहर कोषाध्यक्ष- उत्तमराव कांबळे, शहर उपाध्यक्ष- विलास वाघमारे, महिला शहराध्यक्ष-शोभनाताई कोटंबे,शहर महासचिव- रत्नमाला कांबळे, सुकेशनी खोब्रागडे, शहर उपाध्यक्ष- संध्या काळे, जिल्हा उपाध्यक्ष- मीनाताई रणीत, जिल्हा उपाध्यक्ष- वंदनाताई उरकुडे, जिल्हा सचिव- भारतीताई सावते, महिला संघटक- शीला वैद्य, करुणाताई मून, शहर उपाध्यक्ष- संगीता भवरे, करुणाताई चौधरी, निशा निमकर, दीपक नगराळे, अशोक मनवर, बाळासाहेब विसावा कॉलनी शाखाध्यक्ष- नितेश शाखाध्यक्ष पिंपळगाव सचिन मोहोड, गजानन कोकाटे, संगर गायकवाड, गोलू शिरसाट,सचिन भस्मे.इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

   

No comments